ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण नगरपरिषदकडून नमो उद्यानाचा सर्वानुमते निर्णय व जागा निश्चिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदकडून नमो उद्यानाचा सर्वानुमते निर्णय व जागा निश्चिती.

प्रकाशन: 11 May 2026 09:40 PM
वाचन संख्या 82

मालवण नगरपरिषदकडून नमो उद्यानाचा सर्वानुमते निर्णय व जागा निश्चित. 


मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात 'नमो उद्यान' विकसित करण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याबाबत मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदची विशेष सभा संपन्न झाली. सोमवार, ११ मे रोजी मालवण शहरातील गवंडीवाडा येथील नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर नमो उद्यान निर्माण करण्यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. 


यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्यासह उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक सुदेश आचरेकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका दर्शना कासवकर, भाग्यश्री मयेकर आदी उपस्थित होते.


यावेळी मालवण शहरात शासन आदेशानुसार नमो उद्यान साकारण्यासाठी जागा निश्चितीचा ठराव मांडण्यात आला. राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. सदर योजने अंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायती उत्कृष्ट उद्यान विकसित करण्याकरिता रु. १ कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याकरिता तातडीने जागा निश्चित करून काम सुरु करण्याचे शासनाचे आदेश आहेत. या नमो उद्यानसाठी मालवण शहरातील सात आरक्षित जागा सूचित करण्यात आल्या. मात्र सदर जागांच्या भूसंपादनाला मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने तसेच सदर प्रक्रियेस विलंब होणार असल्याने नगरपालिकेच्या मालकीची व ताब्यात असलेली गवंडीवाडा येथील जागा निश्चित करून तेथे उद्यानाचे काम तात्काळ सुरु करणे शक्य आहे, असे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी सांगितले. 


यावर सभागृहात चर्चा झाली. नगरसेविका शर्वरी पाटकर यांनी ठरावाला सूचक म्हणून भुमिका मांडली. तर प्रभागातील नगरसेवक मंदार ओरसकर यांनी गवंडीवाडा येथे नमो उद्यान होत असेल तर आनंद आहे. मात्र सदर जागेच्या आजूबाजूला व्हाळी असून कचराही टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने व्हाळीतील सांडपाणी बंद करावे तसेच कचरा टाकण्यास बंदी करावी, असे सांगत ठरावाला अनुमोदन दिले. सदर जागेबाबत अन्य नगरसेवक यांनीही सकारात्मक चर्चा करून नमो उद्यानासाठी गवंडीवाडा येथील जागेला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स