ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
श्री. देवी घुमडाई मंदिरच्या १५ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त ५ ते ८ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री. देवी घुमडाई मंदिरच्या १५ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त ५ ते ८ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम.

श्री. देवी घुमडाई मंदिरच्या १५ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त ५ ते ८ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम.

Article image


अध्यक्ष दत्ता सामंत व मुंबई घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष मोहन राणे यांचे घुमडे ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितीचे आवाहन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात १५ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त मंगळवार, ५ मे ते शुक्रवार, ८ मे २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


५ मे रोजी रात्री ९ वाजता स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ६ मे रोजी रात्री ९ वाजता आचरा देऊळवाडी येथील विठ्ठल रखुमाई दिंडी भजन, ७ मे रोजी रात्री ९ वाजता 'महाकाली कलेश्वर लिंग स्थापना' हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. ८ मे रोजी मंदिराच्या वर्धापनदिन सोहळ्यादिनी सकाळी ८ वाजता देवीचे पूजन व विधीवत धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता पालखी सोहळा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ४ वाजता संगीत भजने, रात्री ९ वाजता 'येथे ओशाळला मृत्य' धर्मवीर संभाजी महाराज यांची धगधगती शौर्य गाथा हे नाटक होणार आहे. 


भाविक भक्तांनी वर्धापनदिन सोहळ्याचा आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत व मुंबई घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष मोहन राणे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स