ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बदलत्या काळातही 'वृत्तपत्रांची' वाढती महती व विश्वासार्हता केली अधोरेखित.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बदलत्या काळातही 'वृत्तपत्रांची' वाढती महती व विश्वासार्हता केली अधोरेखित.

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बदलत्या काळातही 'वृत्तपत्रांची' वाढती महती व विश्वासार्हता केली अधोरेखित. 



कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली येथे कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कणकवली येथील स्वामी विवेकानंद सभागृह येथे आयोजित या सोहळ्यात, व्यासपीठावर मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्यासह परिषद प्रतिनीधी गणेश जेठे, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तालुकाध्यक्ष भगवान लोके, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा प्रतिनीधी लक्ष्मीकांत भावे, सचिव संजय सावंत तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, संतोष वायंगणकर, रमेश जोगळे, माजी तालुकाध्यक्ष अजित सावंत, दिगंबर वालावलकर, उपाध्यक्ष उमेश बुचडे, सचिन राणे, उपाध्यक्ष नितीन कदम, नंदू कोरगांवकर, खजिनदार रोशन तांबे, सुधीर राणे, राजेश सरकारे, दर्शन सावंत, माजी जि. प. सदस्य संजय देसाई, बंडू हर्णे, मिलिंद मेस्त्री, बँक संचालक समीर सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, रंजिता तहसिलदार, अस्मिता गिडाळे, उल्का तावडे, तुषार हजारे, योगेश गोडवे, विशाल रेवडेकर, महेश सावंत, किशोर राणे, मिलिंद पारकर, विरेंद्र चिंदरकर, नितीन सावंत, दिलीप हिंदळेकर, भाई चव्हाण, चंद्रशेखर तांबट आदि पत्रकार मित्र उपस्थित होते.


यावेळी संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी बदलत्या काळातही वृत्तपत्रांची महती वाढत असल्याचे स्पष्ट केले. मंत्री नितेश राणे म्हणाले की बदलत्या काळात वृत्तपत्र, सोशल मिडीया - युट्युब चॅनेल, वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत पत्रकारिता विभागली गेली आहे. वाचक म्हणून आणि राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून 'विश्वासार्ह' अशी पत्रकारिता ही वृत्तपत्रांची आहे. कणकवली तालुक्यातील पत्रकारसंघाचे कार्य उल्लेखनीय आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व त्यांची टीम विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवित आहे. पत्रकारांचा नेहमी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर तीन महिन्याला विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल. तसेच ओरोस येथे दर्पण गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरे माफक दरात उपलब्ध केली जातील, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे मंत्री नितेश राणे यांनी विशेष अभिनंदन केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण करत पत्रकारितेचे महत्त्व विशद केले.


या पुरस्कार वितरण सोहळ्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय माळवदे यांना प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार कै. शशी तायशेट्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर देसाई, कै. अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रथमेश जाधव, यशस्वी उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उत्तम पुजारे, वृत्तपत्र कर्मचारी सन्मान पुरस्कार भास्कर रासम यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 


वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे (कणकवली), अरविंद मुद्राळे (तळेरे), बाळा फोंडके (फोंडाघाट) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच खारेपाटण येथील कै. सौ. विना राजेंद्र ब्रह्मदंडे यांच्या मरणोत्तर अवयव दानाने जवळपास सहा अवयव उपयोगात येऊन दुसऱ्यांना नवीन आयुष्य दिल्याबद्दल पती राजेंद्र ब्रह्मदंडे यांचाही विशेष सन्मान पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण यांनी सहभाग घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच भिरवंडे सरपंच नितीन सावंत व उत्तम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रोप देवून सत्कार करण्यात आला. 


जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी सांगितले की, कणकवली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील मोठा पत्रकार संघ आहे. अध्यक्ष भगवान लोके आणि त्यांचे सहकारी चांगले काम करत आहेत. जिल्हा आणि तालुका पत्रकार संघामध्ये चांगले समन्वय आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ओरोस येथे गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे.


यावेळी सभापती हर्षदा वाळके, नगराध्यक्ष संदेश पारकर, गणेश जेठे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भगवान लोके यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक राजेश कदम यांनी व सचिव संजय सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

लोकप्रिय टॅग्स