ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आचरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत आणि विविध मान्यवरांचा भव्य सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत आणि विविध मान्यवरांचा भव्य सत्कार.

आचरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत आणि विविध मान्यवरांचा भव्य सत्कार.

Article image



ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा गाऊडवाडी येथे ब्राम्हण देव देवालय वर्धापन दिन सोहळ्यात उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा भव्य सत्कार संपन्न झाला.


यावेळी, आचरा ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजन गावकर यांनी उद्योजक दत्ता सामंत यांच्याशी निगडीत अशा १९९० च्या दशकापासूनच्या विविध आठवणींना उजाळा देत उद्योजक दत्ता सामंत यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. श्री. दत्ता सामंत हे सध्या देखिल विविध आघाड्यांवर जबाबदाऱ्या पेलताना व्यस्त व व्यग्र असूनही या कार्यक्रमाला उपस्थितीत राहिल्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

Article image

यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि आचरा शिवसेना विभाग प्रमुख उद्योजक संतोष कोदे तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी मालवणचे शिवसेना शहरप्रमुख व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, उपजिल्हा प्रमुख महेश राणे, ग्रामस्थ मान्यवर, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स