ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
अदिती भालचंद्र पुजारे हिचे आयसीएसई बोर्डमधून दहावी परीक्षेत सुयश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अदिती भालचंद्र पुजारे हिचे आयसीएसई बोर्डमधून दहावी परीक्षेत सुयश.

अदिती भालचंद्र पुजारे हिचे आयसीएसई बोर्डमधून दहावीच्या परीक्षेत सुयश.

Article image


मुंबईस्थित पळसंबच्या कन्येचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी गावाच्या वतीने केले अभिनंदन. 

 


मालवण : मुंबईतल्या कांदिवली ( पूर्व ) येथील 'चिल्ड्रन्स ॲकॅडमी' प्रशालेची विद्यार्थिनी कु. अदिती काश्मिरा भालचंद्र पुजारे हिने २०२५/२०२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. मालवण तालुक्यातील मूळ पळसंब गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ उद्योजक भालचंद्र उर्फ बाबू पुजारे व डाॅ. काश्मिरा पुजारे यांची कन्या कु. अदिती भालचंद्र पुजारे हिने आयसीएसई (ICSE) बोर्डमधून दहावीच्या परीक्षेत ९२% गुण प्राप्त केले. 


अदिती पुजारे हिने तिच्या यशात, 'चिल्ड्रन्स अकॅडमी,' कांदिवली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा दिनेश व शीला मल्ल्या, वर्गशिक्षिका सुधासेन गुप्ता, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि तिच्या आई - वडिलांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले आहे. 


बाल लेखिका म्हणून सुपरिचित असलेली कु. अदिती पुजारे हिने गावाला अभिमान वाटेल असे गुण मिळवले आहेत असे नमूद करुन, तिच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब व पळसंब गावच्या वतीने सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी एका संदेशाद्वारे तिचे अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स