ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
द्रौपदी दत्ताराम मुळीक परब यांचे निधन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

द्रौपदी दत्ताराम मुळीक परब यांचे निधन.

द्रौपदी दत्ताराम मुळीक परब यांचे निधन.

Article image

मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक मुळीक परब यांच्या आई होत.


मसुरे | प्रतिनिधी : मसुरे चांदेरवाडी येथील द्रौपदी दत्ताराम मुळीक परब ( वय ९५ वर्षे ) यांचे बुधवारी संध्याकाळी उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी रात्री मसुरे चांदेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिवंगत द्रौपदी मुळीक परब यांचे सामाजिक क्षेत्रात योगदान होते. माजी सैनिक दत्ताराम मुळीक परब यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, स्नुषा, नातवंडे, जाऊ असा परिवार असून उद्योजक आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब यांच्या त्या आई व उद्योजिका राधिका मुळीक परब यांच्या त्या सासू होत.


द्रौपदी मुळीक परब यांच्या निधनानंतर मालवण पत्रकार संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स