ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन.

भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र दिन २०२६ चे औचित्य साधून मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 


यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. बांदेकर, शिक्षिका संजना सारंग, सरोज बांदेकर, शिक्षक आर. बी. देसाई, वरिष्ठ लिपिक पी. टी. गोसावी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी आदी उपस्थित होते. 


यावेळी संबोधित करताना भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईच्या लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर यांनी 'शलाका वार्षिकांक' उपक्रमाद्वारे विद्यार्थीदशेतूनच साहित्यिक घडत जाण्याची संधी असल्याचे सांगत उपक्रमाच्या विविध उद्देशांची प्रशंसा केली. यावेळी श्री. कवटकर यांनी विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक जाणीवांचे आणि कलागुणांचे कौतुक केले.


प्रारंभी मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स