संघर्षग्रस्त माकडे आणि वानरांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ६०० रुपये मानधन निश्चित.
संघर्षग्रस्त माकडे आणि वानरांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ६०० रुपये मानधन निश्चित.
ब्यूरो न्यूज | मुंबई : राज्यात वाढत्या मानव - वानर संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या २२ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, संघर्षग्रस्त माकडे आणि वानरांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आता प्रति माकड ६००/_ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.
हा निर्णय लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत असलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून यामध्ये आधीच्या आर्थिक मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.
शासन निर्णयानुसार, ही नवीन दररचना तात्काळ लागू करण्यात आली असून पूर्वीच्या आदेशातील इतर तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)