ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
डाॅ. शिरीष कदम यांचा महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशन तर्फे गौरव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डाॅ. शिरीष कदम यांचा महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशन तर्फे गौरव.

डाॅ. शिरीष कदम यांचा महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशन तर्फे गौरव.

Article image

Article image

मालवणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर व उद्योजक सौ. स्मृती महेश कांदळगावकर यांच्यावतीने विशेष अभिनंदन.

Article image


मालवण | प्रतिनिधी : मुंबईतील सुप्रसिद्ध रेडिऑलाॅजिस्ट डाॅ. शिरीष रमाकांत कदम यांचा महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशन तर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. डाॅ. शिरीष कदम यांना, मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील 'जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर' येथे १७ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय रेडिऑलाॅजिस्ट असोसिएशनच्या आयोजनातील मार्गदर्शन व योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य रेडिऑलाॅजिस्ट असोसिएशनच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


Article image

मालवण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा संघटक व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी डाॅ. शिरीष कदम यांचे अभिनंदन करताना सांगितले की, मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले डाॅ. शिरीष कदम हे शिक्षण, आरोग्य यांसह क्रिकेट, बास्केटबाॅलसह विविध क्रीडा प्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रीय जाणकार आहेत. आयोजन, नियोजन यांसोबत विविध घटकांच्या पूर्तत्वाच्या पद्धतींची त्यांची अशी अभ्यासू शैली आहे. डाॅ. शिरीष कदम हे गेली दहा वर्षे 'स्पीड फाऊंडेशनच्या' माध्यमातून संस्थापक तसेच अध्यक्ष म्हणून करत असलेल्या कार्याचीही 'हा गौरव म्हणजे एक पोचपावती' असल्याचे सांगून माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी डाॅ. शिरीष कदम यांची विशेष प्रशंसा केली आहे.


या विशेष गौरवाबद्दल मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर व उद्योजक सौ. स्मृती महेश कांदळगावकर यांच्यासह मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा व मालवणमधल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डाॅ. शिरीष रमाकांत कदम यांचे अभिनंदन केले आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स