ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मधपालांसाठी 'मधुर खबर...!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मधपालांसाठी 'मधुर खबर...!'

मधपालांसाठी 'मधुर खबर...!'

Article image


मधुमित्र – मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे आवाहन.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी 'मधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. इच्छुकांनी त्यांची नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. 



मंडळाच्या वतीने गेल्या ३ वर्षापासून ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. मधमाशी पालन व्यवसायास गती मिळावी व मधपालनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशी पालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपालांना, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 


यामध्ये एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांकासाठी रु. ११,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ७,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. ५,००० अशी आहे. दि. २० मे २०२६ रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’चे औचित्य साधून पुणे जिल्ह्यात आयोजित जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयातही नामांकन अर्ज मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय क्र. ९४२२५९५१६२, मधूक्षेत्रिक क्र. ९९७५४६८४३९ संपर्क साधावा. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स