ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा.

Article image


शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार गॅस बुकिंगनंतर ४५ दिवसांच्या आत वितरण सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण ठेवण्याचे निर्देश.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली असून प्रशासनाकडून आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. 

Article image


बैठकीत सर्वप्रथम जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. उपलब्ध साठा, पुरवठा साखळी व भविष्यातील गरज यांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप वितरकांशी सातत्याने समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. 


तसेच एलपीजी गॅस साठ्याबाबतही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्व सेल्स अधिकाऱ्यांनी वितरकांशी समन्वय साधून मागणीनुसार वेळेवर पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. 


शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार गॅस बुकिंगनंतर ४५ दिवसांच्या आत वितरण सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले, जेणेकरून नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये.


याशिवाय PNG (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) जोडणी विस्ताराबाबत MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. ज्या तालुक्यांमध्ये पाईपलाईन जोडणी पूर्ण झाली आहे त्याची अद्ययावत माहिती सादर करण्यास सांगण्यात आले, तसेच विस्तारात येणाऱ्या अडचणी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. PNG जोडणीच्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यावरही भर देण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 441
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 208

लोकप्रिय टॅग्स