ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणात पारंपारिक शिवजयंतीनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणात पारंपारिक शिवजयंतीनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणात पारंपारिक शिवजयंतीनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवप्रेमी, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांच्या उपस्थिती व सहभागाचे आवाहन.


मालवण : पारंपारिक शिवजयंतीनिमित्त, मालवणात 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षाच्या मालवण शाखेच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे पारंपारिक शिवजयंती निमित्त यंदा १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता 'श्री सत्यनारायण महापूजा' आयोजित करण्यात आली आहे. मालवण एस टी स्टॅंड जवळच्या वाघ पिंपळ समोरील 'सिताई काॅम्प्लेक्स' येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत हा उत्सव साजरा होत असल्याची माहिती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मालवण यांच्यावतीने प्रसिद्धी संदेशाद्वारे जाहीर केली आहे.


या उत्सवात संध्याकाळी ७ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सर्व शिवप्रेमी, शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मालवणवासियांनी श्री सत्यनारायण पूजा व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा तसेच सोहळ्यात उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मालवण शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स