ताज्या बातम्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

जाहिरात

अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न.

Article image


अक्कलकोट | प्रतिनिधी : अक्कलकोट 

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्रींचा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात व भक्तीभावात संपन्न झाला. यानिमित्त दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सायंकाळी मंदिरातून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान करण्यात आले. 

Article image


पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद येथून आलेल्या वारकरी दिंड्या, ढोल पथक, फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता. शहरातील चौकाचौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षावाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले व दर्शन घेतले. 

    

फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. 


स्वामी पुण्यतिथी निमित्त आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदींसह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातून स्वामीभक्त अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते. 

    

यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजय दास, नगरसेवक अविनाश मडीखांबे, महेश हिंडोळे, खाजप्पा झंपले, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, प्रा. शिवशरण अचलेर, संजय बडवे, शीवा जमगे, बाळासाहेब एकबोटे, दर्शन घाटगे, रमेश शिंदे, प्रसाद पाटील, अमर पाटील, अंजय फुटाणे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, श्रीनाथ महामूरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, मोहन जाधव, प्रसाद पाटील, नितीन शिंदे, गणेश दिवाणजी, किरण किरात, योगेश पवार, संजय बडवे, रवी मलवे, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, गोकुळ गवंडी, सुनील गवंडी, आदीत्य गवंडी, सुनिल पवार, बंडेराव घाटगे, लक्ष्मण घंटे, स्वामीराव मोरे, अशोक घंटे, प्रशांत गुरव, ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव तसेच देवस्थानचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी, स्वामी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळ...

17 Nov 2026 412

लोकप्रिय टॅग्स