ताज्या बातम्या
सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यास प्रारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यास प्रारंभ.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यास प्रारंभ. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त), वराडकर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने शतकोत्तर शतकपूर्ती वर्षानिमित्त भव्य शतक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक ११ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. 

या महोत्सवाची सुरुवात शनिवार, ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता के. डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व मूर्तीपूजनाने होणार आहे. यानंतर ‘वंदना’ स्मरणिका व चित्रफितीचे प्रकाशन होईल. यावेळी खासदार नारायण राणे हे उदघाटक असतील तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. निलमताई राणे यांची उपस्थिती असणार आहे.  


रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता भव्य शोभायात्रा (विठ्ठल, ढोल-ताशा, लेझीम व पारंपरिक वेशभूषेसह) आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता सत्कार सोहळा होणार असून, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारी मान्यवरांचे मनोगत व सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. रात्री बालदशावताराचा कार्यक्रमही होणार आहे.


सोमवार, १३ एप्रिल रोजी सन्मान स्त्री शक्तीचा सोहळा संस्कृतीचा हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उदघाटक पालकमंत्री नितेशजी राणे असणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. 

मंगळवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ८.३० वाजता शतक महोत्सवाच्या प्रथम सत्राचा सांगता सोहळा पार पडेल. सकाळी ९ वाजता अभिवादन सभा होईल, तर १० वाजता ‘भीम स्वर वंदना’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीतांचा असणार आहे.


या चार दिवसांच्या महोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, शिक्षण क्षेत्रातील योगदान, माजी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान, तसेच सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्यावर भर देण्यात आला आहे.

शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित या महोत्सवात परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, पालक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स