ताज्या बातम्या
ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
मालवणात खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना भेटवस्तू वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना भेटवस्तू वाटप.

मालवणात खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना भेटवस्तू वाटप.

Article image

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक - नगरसेविका तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित.

 


मालवण | प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल २०२६ रोजी मालवण शिवसेना शाखा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मच्छीमार महिलांना मत्स्य व्यवसायाला उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. 

Article image


यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, यंदा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचा ७४ वा वाढदिवस आहे म्हणजेच ७५ व्या वर्षात पदार्पण आहे. खासदार नारायणराव राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा देशात नेऊन ठेवला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना छत्री आणि मत्स्य व्यवसायास उपयोगी भेटवस्तू वाटप कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. दर महिन्याच्या १० तारीखला खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. खासदार नारायणराव राणे यांना दीर्घायुष्य लाभो, अशीही प्रार्थना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. 


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, जिल्हा संघटक व स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका मेघा गावकर, शहर संघटक राजू बिडये, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा परिषद सभापती संतोष साटविलकर, मच्छिमार सेल शहरप्रमुख वसंत गावकर, मच्छिमार सेल तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, पदाधिकारी राजा गावकर, बाळू नाटेकर तसेच मोहन वराडकर, देवली सरपंच श्याम वाक्कर, उद्योजक परशुराम पाटकर, सूर्या फणसेकर, गुरू मणचेकर, भाई मांजरेकर आणि मच्छिमार महिला व सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


लाभार्थी मच्छिमार महिलांच्या वतीने उपयुक्त वस्तू वाटपाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. उपस्थितांच्या वतीने खासदार नारायणराव राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स