ताज्या बातम्या
ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या सदस्यपदी अनिल भिसे यांची बिनविरोध निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या सदस्यपदी अनिल भिसे यांची बिनविरोध निवड.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या सदस्यपदी अनिल भिसे यांची बिनविरोध निवड. 

Article image


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार, ०८ एप्रिल रोजी पर्णकुटी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


जिल्हा कार्यकारणीचे तत्कालीन सहसचिव तथा सदस्य कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. 


श्री. भिसे यांना यावेळी पत्रकार संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई, उमेश सावंत, विनायक गांवस, हरिश्चंद्र पवार, मंगल नाईक - जोशी, अमोल टेंबकर, ॲड. संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 


यावेळी तालुकाध्यक्ष सचिन रेडकर, जिल्हा कार्यकारीणीचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सह सचिव विनायक गांवस, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सागर चव्हाण, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, पत्रकार उमेश सावंत, काका भिसे, दीपक गांवकर, रूपेश हिराप, जतिन भिसे, प्रसन्न राणे, मंगल नाईक-जोशी, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक, प्रणव तारी आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव यांनीही अनिल भिसे यांची भेट घेत अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील पत्रकार देखील उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स