ताज्या बातम्या
ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
पत्रकार संजय पिळणकर यांना 'ज्ञानदीप' पुरस्कार जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पत्रकार संजय पिळणकर यांना 'ज्ञानदीप' पुरस्कार जाहीर.

पत्रकार संजय पिळणकर यांना 'ज्ञानदीप' पुरस्कार जाहीर. 

Article image



सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : पत्रकार संजय पिळणकर यांना पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील दोन दशकांच्या योगदानाबद्दल 'ज्ञानदीप' पुरस्कार सन २०२६ साठी जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने हा गेली २० वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. 


यंदा या पुरस्कार मानकरी मान्यवरांच्या मांदियाळीत, पत्रकार संजय पिळणकर यांच्यासह सुरेश जानू काळे, सायली सीताराम लांबोर, संगीता तानाजी सोनटक्के, विलास अर्जुन कासकर, दीपक राऊत, आनंद महादेव देवळी व आनंदी रुघनाथ घोटे अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. 


सिंधुदुर्ग न्यूज साठी कार्यरत असलेले श्री. संजय पिळणकर यांच्यासाठीच्या पुरस्काराच्या घोषणेनंतर अनेक जणांकडून, कोवीड काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांनी मदतीचा एक हात म्हणून

प्रथम पुढाकार घेत देऊ केलेला 'एकावन्न हजार रुपयांची धनादेश' व तत्सम विविध उत्स्फूर्त मदतींची विशेष आठवण काढण्यात येत असून त्यांचे विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स