ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
'हीच एक आळवणी....!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'हीच एक आळवणी....!'

'हीच एक आळवणी....!'

Article image


(ईस्टर संडे विशेष रचना)


कवी : रुजारिओ पिंटो, दांडी, मालवण ( सिंधुदुर्ग) 


दास्य शृंखला तोडुनी

येशू अमर जाहला जगती |

त्या त्यागाचे दृश्य पाहुनी

गुंग होतसे मति ||


क्रुसावरूनी त्या देवात्म्याने

संदेश दिला त्रिभुवनी |

आठवणी त्या जागृत होऊनी 

उफाळती ह्या मन्मनी ||


आनंद करा साजरा 

उजळण्या ती स्मृती |

दिनदुबळया साह्य करा

हीच कृतज्ञता त्या प्रति ||


तुम्हांसाठी प्रार्थितो मी

यशस्वी व्हा जीवनी |

जगा आणी जगू दया

हीच एक आळवणी ||



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स