ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
मळगाव येथे १० व ११ एप्रिल रोजी तेलकाटा उत्सव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मळगाव येथे १० व ११ एप्रिल रोजी तेलकाटा उत्सव.

मळगाव येथे १० व ११ एप्रिल रोजी तेलकाटा उत्सव.


सुयोग कलामंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाचे आयोजन.


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी तालुक्यातल्या मळगाव तेलकाटावाडी येथील सुयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळावतीने आयोजित 'तेलकाटा उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये १० व ११ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Article image


शुक्रवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘स्वरसंध्या’ हा संगीत कार्यक्रम होणार असून यामध्ये गायक बुवा पुरुषोत्तम परब, बुवा हर्षल मेस्त्री, बुवा कौस्तुभ धुरी यांच्यात तिरंगी संगीत जुगलबंदी रंगणार आहे. या तिन्ही बुवांना तबला - विनोद देऊलकर व पखवाज - सचिन पांगम हे संगीतसाथ करणार आहेत. त्यानंतर रात्री रात्री ९.०० वाजता तेलकाटावाडीतील बालकलाकारा 'हसत खेळत उपदेश जीवनाचा' हे नाटक सादर करणार आहेत. त्यानंतर नृत्याविषयक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.


शनिवार ११ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजता, लोकराजा सुधीर कलिंगाण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर , कुडाळ यांचा एकपदा अर्थात पृथ्वीकंकण हा ट्रिकसीनयुक्त पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन तेलकाटावाडी येथील सुयोग कला रंगमंच (बाबी लातये यांचे निवासस्थानी) येथे करण्यात आले आहे. 


रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स