....'तर' वस्त्रहरण नाटकात असणार होतंय : ज्येष्ठ रंगकर्मी गिरीधर पुजारे.
....'तर' वस्त्रहरण नाटकात असणार होतंय : ज्येष्ठ रंगकर्मी गिरीधर पुजारे.
ब्यूरो | सांस्कृतिक : सुप्रसिद्ध नाट्यकर्मी कै. मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबुजी यांच्या जन्मदिवसाच्या तथा २०२६ सालच्या मालवणी भाषा दिवसाचे औचित्य साधून रंगमंच तसेच कला क्षेत्रातून विविध मान्यवरांनी कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मृतींना उजाळ देत वंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे मुंबईस्थित रंगकर्मी यांनी त्यांची कलेची आवड आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या सहवासाबद्दल एका संदेशाद्वारे विशेष माहिती दिली आहे. श्री. गिरीधर पुजारे यांनी गावातून मुंबईत जाऊन जवळपास चार दशके नोकरी केली होती.
श्री. गिरीधर पुजारे.
कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या आठवणींना उजाळा देताना श्री. पुजारे म्हणतात की, त्यावेळी,'नोकरी सोडली असतय तर वस्त्रहरण मध्ये आसणार होतंय. माझ्या एका मित्राक आणि माका बाबूजींनी तसो प्रस्ताव ठेवलो होतो. पण त्याकाळी आधीच तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळणा ह्या भाग्य होता आणि आपल्या कलेर प्वाट भरु शकतंव असो कुटुंबाक विश्वास असाचो तो काळ नव्हतो. अनेक जबाबदारये खांद्यार होते. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात बोलावणा येऊन देखिल जावचा भाग्य लाभला नाय.'
आणखी एका आठवणीबद्दल श्री. पुजारे म्हणतात की,' एकदा सतिश रणदिवे यांच्या प्रित्यर्थ मालवणी एकांकिका स्पर्धा होती. त्यात मी जी एकांकिका लिवलेलंय ती तेंका खूप आवाडली होती. दुसरा एक राज्य नाट्य स्पर्धेतल्या नाटकातला माझा काम तेंका आवाडला होता. 'अमर हिंद मंडळ' एकांकिका स्पर्धेत माका अभिनय पहिला पारितोषिक त्यांच्या हस्ते मिळाला होता. त्यावेळच्या भाषणात त्यांनी 'बघा, आमचो मालवणी पहिलो इलो...,' असा म्हणलेले उद्गार आजही माका जशाक तशे आठवतंत आणि मन भरान येता...!'
ज्येष्ठ रंगकर्मी श्री. गिरीधर पुजारे यांच्या आठवणी ह्या कोकणातील असंख्य 'मालवणी नाट्य व भाषा प्रेमींचे' तत्कालीन वास्तव....!
आवडीच्या कला क्षेत्राच्या सर्विस लाईनला शिवून नोकरी - व्यवसाय यांच्या जगामध्ये स्वतःला बांधून घेतलेले.....'तर' चे तत्कालीन वास्तव...!
मालवणी भाषा दिनाचा औचित्य साधून श्री. गिरीधर पुजारे यांनी,"'सर्व उत्सुक कलावंतांच्या आवडीक, 'भरवशाचे मंच' मिळान देत आणि त्यांची कारकिर्द घडान देत' अशी कळकळीची प्रार्थना केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)