किल्ले सिंधुदुर्ग येथे श्री रामनवमी उत्सव पारंपरिक उत्साहात.
किल्ले सिंधुदुर्ग येथे श्री रामनवमी उत्सव पारंपरिक उत्साहात.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक शिवकालीन परंपरा जपत श्री रामनवमी उत्सव , २६ मार्च २०२६ रोजी साजरा करण्यात आला. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात संपन्न झाले. श्री शिवराजेश्वर यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर कीर्तनकार मंगेश परब यांचे श्री राम जन्माचे कीर्तन सादरीकरण करण्यात आले.
मंदिराच्या सभामंडपात साकारलेल्या पाळण्यात श्री प्रभू श्री रामांच्या मूर्तीला पाळण्यात ठेवण्यात आले. यावेळी श्री रामांच्या जयघोषाने फुले व गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात शिवराजेश्वर मंदिराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. या पालखी मिरवणुकीत किल्ले सिंधुदुर्ग रहिवासी सहभागी झाले.
किल्ले सिंधुदुर्ग वरील ऐतिहासिक सोहळ्यात देवस्थानचे मुख्य पुजारी सयाजी सकपाळ, दिलीप सकपाळ, नामदेव सकपाळ, श्रीराम सकपाळ, हनुमंत वायंगणकर, मंगेश सावंत, दीपक फाटक, प्रसाद आडकर, नरेश सावंत, किल्ले रहिवाशी उपस्थित होते.
मालवण तालुक्यात किल्ले सिंधुदुर्गसह मालवण श्री देव रामेश्वर मंदिर, कांदळगाव रामेश्वर मंदिर, तारकर्ली, गवंडीवाडा राम मंदिर तसेच आचरा रामेश्वर मंदिर मालवण एस टी स्टॅन्ड राम मंदिर येथे रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.