मालवणात आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात.
मालवणात आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात.
आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'पारंपरिक रोंबाट' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, नगरसेवक महेन्द्र म्हाडगुत, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व उद्योजकांची उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष, मालवणच्या वतीने, कुडाळ मालवणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या २६ मार्च रोजीच्या वाढदिवसानिमित्त, मालवण भरड येथील मालवण नगरपरिषद वाहनतळ येथे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुधवारी २५ मार्च रोजी आयोजित वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैभव नाईक व त्यांची पत्नी सौ. स्नेहा नाईक यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, नगरसेवक महेन्द्र म्हाडगुत, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, उप शहरप्रमुखउमेश मांजरेकर, नंदू गवंडी, गौरी मयेकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेथर, रुपा कुडाळकर, माजी नगरसेविका पूजा करलकर तसेच मान्यवर, पदाधिकारी, महिला व युवती पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालक अक्षय सातार्डेकर यांच्यासह उपस्थितांच्या वतीने मालवणी भाषेत 'विशेष गाऱ्हाणं' घालण्यात आलं. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी आमदार वैभव नाईक तसेच माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्या हस्ते व व्यासपीठावरील मान्यवर, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त विशेष आकर्षण असलेल्या रोंबाट उत्सवाचा माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह माजी नगरसेवक व ज्येष्ठ उद्योजक नितीन वाळके, माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, आंबा व काजू बागायतदार उद्योजक आप्पा चव्हाण, सौ. राधिका मोंडकर व मान्यवरांनी आमदार वैभव नाईक यांना मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.
या वाढदिवस सोहळ्याला माजी आमदार वैभव नाईक, पत्नी सौ. स्नेहा नाईक यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उप शहरप्रमुख उमेश मांजरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, नगरसेवक महेन्द्र म्हाडगुत, नगरसेवक तपस्वी मयेकर, ज्येष्ठ उद्योजक राजा शंकरदास, ज्येष्ठ उद्योजक रवी तळाशिलकर, ज्येष्ठ व्यापारी किरण वाळके, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, महिला तालुका संघटक दिपा शिंदे व शहर संघटक रश्मी परुळेकर, रुपा कुडाळकर, हेमंत मोंडकर, राधिका मोंडकर, स्वप्नील आचरेकर, उद्योजक अन्वय प्रभू, माधुरी प्रभू, अमित भोगले, वायरी सरपंच भगवान लुडबे, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, बबन वाघ, युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेथर, गौरी मयेकर, निलेश दुदवडकर, उद्योजक आप्पा चव्हाण, सदा लुडबे, ज्येष्ठ व्यावसायिक प्रमोद करलकर, ॲड. सुमित जाधव, संदेश कोयंडे, चिंतामणी मयेकर, उद्योजक व पदाधिकारी उमेश चव्हाण, गणेश चव्हाण, गणपत आडीवरेकर, महेश सुर्वे, युवराज मेस्त्री, चंदू खोबरेकर, युवा पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर, विनायक आरोलकर, उद्योजक करण खडपे, गोपाळ आचरेकर, राजन लुडबे, मसुरे विभाग युवतीसेना अधिकारीसौ. आर्या गावकर, दिलीप घारे, बंड्या लुडबे, सुप्रिया मडये, युवा उद्योजक अमेय देसाई, बाळा गिरकर, भाग्यश्री लाकडे, उद्योजक अमोल सावंत, ज्येष्ठ उद्योजक रुपेश प्रभू, मयूर करंगुटकर, सोनाली डिचवलकर, उद्योजक योगेंद्र गावकर, योगिता गावकर, निधी मुणगेकर, बबन वाघ, संजना रेडकर, बाप्पा वायंगणकर, सचिन रेडकर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांची कन्या कु. नंदिनी नाईक व चिरंजीव कु. राजवर्धन नाईक यांचीही सोहळ्याला विशेष उपस्थिती होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने, आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'पारंपरिक रोंबाट' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध मान्यवर आणि उपस्थितांनी आयोजकांची विशेष प्रशंसा केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नागरीकांनी आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.