ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा विश्वास...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा विश्वास...!

प्रकाशन: 02 Feb 2026 06:29 PM
वाचन संख्या 394

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा विश्वास.


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधल्या महायुतीच्या 'नियोजनबद्ध प्रचार यंत्रणे' च्या यशाची १००% खात्री.


विरोधकांचे आव्हानच नसल्याचा पुनुरुच्चार...! 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधल्या ऐतिहासिक यशाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, खासदार नारायण राणे, शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर तसेच नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा अशा प्रभावशाली व विशेष परिणामकारक घटकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांमधल्या १०० % यशाचा विश्वास दर्शविला आहे.  


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची यशस्वी वाटचाल सुरू असून नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले. सिंधुदुर्गात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील महायुतीला अशाच प्रकारे भव्यदिव्य यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. गेल्या दोन अधिवेशनांमध्ये आमदार निलेश राणे यांनी अभ्यासपूर्व मुद्दे मांडून मतदार संघात विकास निधी आणण्यात यश मिळवले. यामुळे याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला महायुतीला होऊन शंभर टक्के जागांवर आमचे उमेदवार सहज विजय होतील असे सांगून आम्हाला विरोधकांचे कोणतेही आव्हान नाही असेही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अधोरेखीत केले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार महायुतीकडे आकर्षित होतानाचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मालवण मध्ये जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या १२ तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या १८ ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स