ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व टीमची केली विशेष प्रशंसा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व टीमची केली विशेष प्रशंसा.

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व टीमची केली विशेष प्रशंसा. 

Article image


कणकवलीत 'एक दिवस छोट्यांचा ; खाऊ गल्ली २०२६' उपक्रम उत्साहात. 

Article image


माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, राजू गवाणकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत, संजीवनी पवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती.

Article image


कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली येथे 'खाऊगल्ली २०२६' या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व टीमची विशेष प्रशंसा केली. पालकमंत्री नामदार नितेश राणे म्हणाले की राजकारण आणि निवडणुका येत -जात राहतात, पण जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. पालकमंत्री नामदार नितेश राणे आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील टीम 'खास. नारायण राणे यांच्या' संस्कारांतून घडलेली असून, पद असो वा नसो, जनतेची सेवा हीच आमची ओळख आहे, असेही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले.

Article image



यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, राजू गवाणकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत, संजीवनी पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे ना. नितेश राणे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला कणकवलीकरांसह संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांच्या आनंदाचा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारा हा उपक्रम यंदाही तितक्याच दिमाखात पार पडला. लहान मुलांसाठी आयोजित या खास कार्यक्रमात मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून कणकवलीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


राणेसाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी समीर नलावडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.


समीर नलावडे यांच्यातील सेवाभाव हा सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या संस्कारांचे प्रतिबिंब आहे. जनतेच्या सुखासाठी झटणे आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे हीच आमची कार्यपद्धती आहे, असेही ना. नितेश राणे म्हणाले.


गणपतीसाना परिसर लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. उद्घाटनापूर्वी लहान मुलांनी पन्नास रुपयाचे कुपन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुलांनी विविध खेळ खेळून कार्टून सह सेल्फी पॉईंटवर रेंगाळत खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. मिकी माऊस, छोटा भीम, डोरेमॉन अशी कार्टून्सने लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत धम्माल केली. लहान मुलांना प्रश्न विचारून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांसाठी लकी ड्रॉ काढून बक्षिसेही देण्यात आली.


खाऊ गल्ली उपक्रमामुळे टेंबवाडी रस्ता ते गणपती सान्यापर्यंत संपूर्ण परिसर गर्दीने गजबजून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील दुतर्फा लागले होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकानेही होती. बच्चे कंपनीसाठी खास गोल फिरणाऱ्या गाड्या, झोपाळे असे विविध प्रकारचे खेळ होते. लहान मुलांना आनंद, मज्जा मस्ती करता यावी यासाठी काही वर्षापासून सातत्याने समीर नलावडे मित्र मंडळाच्यावतीने खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स