'विराट' फोटो..!
'विराट' फोटो .......!'
संपादकीय : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात, खासदार नारायणराव राणे यांचा '४ जानेवारी २०२६ चा' म्हणजे आजचा दौरा आणि असंख्य राणे प्रेमींचा डिजीटल माध्यमातून तसंच वाॅटस ॲप स्टेटस द्वारे ओसंडून वहाणारा उत्साह याची चर्चा आहे...! ह्या उत्साहाचा राजमार्ग बांदा ते कणकवली असा जरी असला तरिही जिल्ह्यातील तालुके, विभाग, ग्राम आणि नगरे अशा चहूबाजुंनी तो भरभरून असाच दिसतो आहे.
आभासी माध्यमातून 'हाय डेफिनेशन' फोटोंची प्रचंड मोठी देवाण घेवाण होते आहे. खासदार नारायणराव राणे यांच्या सोबत पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या आजच्या राजकीय सामर्थ्याची एकत्रीत सुस्वर 'आरोहाची' अशी चुणूक दाखवणारे चकचकीत फोटो सुद्धा विशेष लक्षवेधी ठरतायत..! 'सदैव राणे कुटुंबियांच्या सोबत ठाम' राहिलेली अनेक राजकीय 'माणसं' सुद्धा तीनही राणेंसोबतच्या आपापल्या फोटोंना नव्याने जगवताना आणि जागवताना दिसतायत.....! वातावरण अभिमान आनंदासोबत भावनिक देखिल आहेच.....!
ह्या सगळ्या डिजीटल उत्साहात खासदार नारायणराव राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आगमना दरम्यानचा एक फोटो आठवतो.....!
१९८९ नंतर जवळपास एक दशक 'तो' एकच फोटो 'सबकुछ' होता....!
तो फोटो , "सन्माननीय नारायण राणे, आमदार नारायण राणे, राणे साहेब, आमचे दादा.....," आणि असंख्य आदरयुक्त दबदब्यांच्या फोटो होता...!
कुठलाही मोठा बॅनर नाही किंवा ह्या फोटोंनी वृत्तपत्रांची पानंच्या पानं भरलेली नाहीत पण तरिही तर फक्त हा फोटो जिथे कुठे असेल त्याच्या खालचं स्थळ, तारीख आणि वेळ पाहून अनेक गाड्यांना किक् मारली जायची, एसट्यांची भरभरभरून तिकीटं काढली जायची, ट्रक - टेंपो - ट्रॅक्स - सुमो गाड्या बुक व्हायच्या आणि इतकंच काय तर काही शाळकरी मुलांच्या सायकलींचीही चेन टाईट होत ऑईलिंग करुन चकचकीत बनवून दिमाखात पॅडल मारलं जायचं ...!
ह्या एका फोटोचं रुप 'विशाल' नव्हतं तर ते 'विराट' होतं....!
हा फोटो झळकला की समजून जायचं की मागोमाग आता एक संवाद दुमदुमणार," दादा येतं हत.....! आम्ही बघुक चललंव ...., येतास तुम्ही.?"
काही भाग्यवंतांवरचं 'प्रेम' दिसत नसलं तरी ते विराट असतं अगदी सर्वव्यापी आभाळासारखं....!
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय क...