पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उत्साहात भूमिपूजन.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उत्साहात भूमिपूजन.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी, हा दिवस ऐतिहासिक असून या इमारतीचे महत्व सावंतवाडी उपविभागातील प्रत्येक नागरिकाला आहे असे सांगितले. या इमारतीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे आभार मानले. ही इमारत ठरलेल्या कालावधीत पूर्ण होणे अत्यावश्यक असून, दोन वर्षांच्या ऐवजी एका वर्षातच काम पूर्ण झाल्यास संबंधित यंत्रणेचा विशेष सत्कार करण्यात येईल असेही ते म्हणाले.
नवीन इमारतीतून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख झाले पाहिजे असे स्पष्ट करत पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, नागरिकांना कमीत कमी चकरा माराव्या लागतील, अशा पद्धतीने कामकाज व्हावे. नागरिकांशी आपुलकीने वागणे, त्यांच्या कामांना प्राधान्य देणे व कोणतीही तक्रार निर्माण होऊ न देणे, हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विकासकामे आणि विविध प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की या विकास प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग हे तीन तालुके विकासाची मोठी क्षमता असलेले असून, या उपविभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले की, ही इमारत अत्यंत सुसज्ज स्वरूपाची असणार या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक सेवा पारदर्शकपणे मिळणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली. त्या म्हणाल्या की, आजचा हा क्षण ऐतिहासिक आहे. सन १९१० साली बांधण्यात आलेली जुनी इमारत आता कालबाह्य झाल्याने नागरिकांच्या गरजेनुसार नवीन आणि आधुनिक इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही इमारत भविष्यात नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
उपविभागीय अधिकारी सचिन घारे यांनी आभार प्रदर्शन केले तसेच या इमारतीमधून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला जाईल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष श्रीमती श्रद्धा राजे भोसले, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी सचिन घारे, उपसंचालक जमाबंदी आयुक्त कार्यालय हेमंत निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, युवराज भोसले आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. ...
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.