कुडाळ - मालवण तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर.
कुडाळ - मालवण तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मानले आभार.
मालवण | ब्यूरो न्यूज : १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ - मालवण तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण तालुक्यात तारकर्ली तर कुडाळ तालुक्यात वाडोस, गोठोस, जांभवडे, घोटगे याठिकाणी नवीन इमारती मंजूर झाल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे.
या निधीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, आरोग्य सुविधांचा दर्जा निश्चितच उंचावणार आहे. हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
मालवण भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिर संपन्न.