भाजप वैद्यकिय आघाडी मालवण तालुका संयोजकपदी चिंदर येथील उद्योजक प्रकाश मेस्रींची निवड..!
प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी केली निवड जाहीर
चिंदर | विवेक परब : मालवण भाजप कार्यालयात आज भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाँ. अमेय देसाई यांनी भेट दिली. देसाई यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी अनेक विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजप तालुका वैद्यकीय संयोजकपदी चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक श्री प्रकाश दिनकर मेस्री यांची निवड जाहिर केली व तालुक्याची जबाबदारी दिली तसेच मेस्री यांना डाॅ.अमेय देसाई यांनी शुभेच्छा दिल्या व स्वागत तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी केले.
यावेळी कार्यालयीन सचिव शरदचंद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत आणि बाळु देसाई, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक दीपक पाटकर, विजु केनवडेकर, बाबा परब,माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, आबा हडकर, पंकज वालावलकर, पूजा करलकर, प्रमोद करलकर, मुणगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)