ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
तोंडवळी तळाशिल येथे २० व २१ डिसेंबर रोजी सर्फ फिशिंग स्पर्धा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

तोंडवळी तळाशिल येथे २० व २१ डिसेंबर रोजी सर्फ फिशिंग स्पर्धा.

प्रकाशन: 18 Dec 2025 06:12 AM
वाचन संख्या 438

तोंडवळी तळाशिल येथे २० व २१ डिसेंबर रोजी सर्फ फिशिंग स्पर्धा.


कोकण एक्स्ट्रीम अँगलर्सच्या वतीने आयोजित स्पर्धेत १२० हून अधिक अँगलर्सचा लागणार कस..!

Article image


घसघशीत बक्षिसांची रेलचेल..!


ब्यूरो न्यूज : कोकण एक्स्ट्रीम अँगलर्सच्या वतीने, २० आणि २१ डिसेंबर रोजी तोंडवळी तळाशिल समुद्र किनाऱ्यावर होणारी सर्फ फिशिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत १२०पेक्षा अधिक अँगलर्स, ३ सत्रे, आणि समुद्राच्या लाटांमध्ये रंगणारी कौशल्याची लढत पाहायला मिळणार आहे. रील व रॉडच्या सहाय्याने गळाने मासे पकडण्याची ही स्पर्धा सकाळी आणि संध्याकाळी होणार आहे.

Article image


या स्पर्धेत मास्यांची लांबी व प्रजातीवर आधारित गुणांक पद्धतीचा अवलंब होणार असून आकर्षक रोख पारितोषिके (₹५०, ००० / ₹४०,०००/ ₹३०, ०००/_), ट्रॉफी व टॅकल्स, तसेच महिला स्पर्धकांसाठी विशेष पुरस्कार अशी घसघशीत बक्षिसांची रेलचेल असणार आहे. 

Article image


कोंकणातील सर्फ फिशिंग संस्कृतीला नवे बळ देणारी ही स्पर्धा साहसी खेळप्रेमींना भुरळ घालणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स