ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ व २० डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ व २० डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ.

भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ व २० डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ.

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १९ व २० डिसेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहे.


१९ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक सतीश लळीत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर असतील. तसेच संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


यावेळी मान्यवरांचा सत्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कार, कनिष्ठ महाविद्यालय आदर्श विद्यार्थी पुरस्कार तसेच स्व. टेमकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांची मार्गदर्शक भाषणे होणार असून दुपारी १२ वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.


२० डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे तर दुपारी २:३० वाजता प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


या स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमास पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईच्या कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट, स्थानिक कमिटी तसेच मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स