ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
कुष्ठरोग शोध मोहीमेसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कुष्ठरोग शोध मोहीमेसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.

प्रकाशन: 17 Nov 2025 06:59 PM
वाचन संख्या 209

कुष्ठरोग शोध मोहीमेसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.

Article image


सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत असून, आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहेत. नागरिकांनी या पथकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, कुष्ठरोग निर्मूलनासाठी समाजात जागृती होणे अत्यावश्यक आहे. 'शून्य कुष्ठरोग प्रसार', हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथक घरी आल्यानंतर तपासणी करून घेऊन त्यांना पूर्ण सहकार्य करावे तसेच काही संशयास्पद लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.


या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक घराघरांत जाऊन कुष्ठरोगाची लक्षणे तपासून पाहणार आहेत. विशेषतः जोखीमग्रस्त व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचून लक्षणांची ओळख, वेळेवर उपचार, रोगप्रसार रोखणे आणि सामाजिक भेदभाव कमी करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.


जिल्हा प्रशासनाने नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहकार्य करून आरोग्यदायी व कुष्ठरोगमुक्त सिंधुदुर्गासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स