ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मौनं सर्वार्थ साधनम् पासून मौनं स्विकृती लक्षणम् ...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मौनं सर्वार्थ साधनम् पासून मौनं स्विकृती लक्षणम् ...!

प्रकाशन: 17 Nov 2025 04:56 PM
वाचन संख्या 160

मौनं सर्वार्थ साधनम् पासून मौनं स्विकृती लक्षणम् ...!

Article image


संपादकीय : श्री. महेश कांदळगांवकर....! 

२०१६ सालच्या मालवण नगरपरिषद निवडणुकांमधील लोकांमधून निवडून आलेले नगराध्यक्ष...!

२०२५ साली मागे वळून पहाताना किंवा सिंहाव'लोक'न करताना,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांना नगराध्यक्ष पदासोबत त्याला समांतर चालत आलेल्या अनेक प्रतिकूल स्थिती आणि परिस्थिती लक्षात येतात. राजकारणात उतरताना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा तत्कालीन मुकुट हा टोचरा असतो ह्याची अर्थातच त्यांना जाणीव होती आणि तसं त्यांनी जाहीर बोलून देखिल दाखवलेलं होतं परंतु तो टोचरा मुकुट दिवसेंदिवस बोचरा होत जातानाची एकंदरची स्थिती असाच त्यांचा कार्यकाल म्हणावा लागेल. 


२०२० च्या कोरोना काळापासून पद, जबाबदारी याहीपेक्षा 'लोक'नियुक्तीची धुरा या घटकाशी त्यांची नैतिकता जवळपास 'चार वर्षांचे अग्नीदिव्य' ठरत गेली.


यात सुरवातीला त्यांनी 'नको ....आता ब्बास..' अशा मानसीक स्थितीला जाहीर देखिल केले आणि 'आता ब्बास च्या पुढचे 'लोकांचे' ध्यास आणि त्रास ह्याची त्यांना जाणीव होत होती. तिथेच त्यांच्या स्वतःतील अदृश्य वेदनेला स्विकृतीची संवेदना मिळाली....आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची समयोचित धारणा त्यांच्या भात्यातील महत्वाचे शस्त्र तसेच अस्त्र बनले.


२०२२ नंतर, माजी नगरसेवक श्री. कांदळगांवकर आणि तत्कालीन नगरसेवक मान्यवरांना तांत्रिकदृष्ट्या कागदावर 'माजी' असे नमूद करावे लागले. खरंतर ती पदाच्या मुकुटाची टोचणी तिथेच 'तांत्रिकदृष्ट्या नियमाप्रमाणे' मुक्त करत होती परंतु, श्री. महेश कांदळगांवकर यांना तिच्या नैतिकतेची बोचरी सुईचे टोक सतत टोचत होते...! ते दिवसेंदिवस अंतर्मुख होत होत 'मौनं सर्वार्थ साधनम्' अशा स्थितिकडे चालत होते.

दरम्यान अनेक राजकीय स्थित्यंतरं घडली परंतु श्री. कांदळगांवकर यांनी एखादा दुर्मिळ जाहिर मंचावरील प्रसंग वगळता स्वतःच्या जबाबदारीला 'हस्तांतरीत' होऊ दिले नव्हते...! त्यांना रडगाणं गाऊ शकू असा खांदा नको होता तर शहरच्या विकासाची जबाबदारी पेलू शकेल अशी खंदी यंत्रणा हवी होती.. ! 


१६ नोव्हेंबर २०२५ ची दुपार...!

कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना खुद्द सन्माननीय आमदार आणि जिल्हाप्रमुख यांनाही श्री. महेश कांदळगांवकर यांच्या मौनासहीत 'तपश्चर्येला' मुक्तकंठाने दाद देण्याचा मोह आवरला नाही..! 


मान्यवर नेते दाद देत होते...टाळ्या वाजत होत्या.....माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर मूकपणे 'लोक'नियुक्तीच्या कणाकणाने मुक्त होत होते...!


श्री. महेश कांदळगांवकर स्वतःसाठी टाळ्या वाजवू शकत नव्हते. ..पण परमेश्वर त्यांच्या हातांनी त्यांचाच खांदा टाळी वाजवल्यासारखा थोपटत हळूवार होता...!


या प्रसंगी, आनंद, समाधान याही पलिकडच्या जाणीवांचा अर्थात् 'मौनं स्विकृती लक्षणम्' चा जयघोष, माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगांवकर यांचा तत्कालीन अवघा मतदार राजा 'मूकपणे' करत होता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे..! 


'वर्तमान काळाचे ट्रेंडस्' जपताना, अलिखित 'नैतिकता' जाणणारे नेतृत्व आणि त्याला मुक्तकंठाने दाद देणारे वरीष्ठ ही काळाची गरज होती, आहे...आणि राहील.




(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स