न्हावेली येथे दिवाळी उत्सव २०२५ उत्साहात.
न्हावेली येथे दिवाळी उत्सव २०२५ उत्साहात.
प्रसाद गावडे आणि मान्यवरांची उपस्थिती.
मळगाव | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातल्या न्हावेली चौकेकरवाडी येथे आयोजित दिवाळी पडवा निमित्त दिवाळी उत्सव २०२५ उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसांच्या या भव्य कार्यक्रमास ग्रामस्थांचा तसेच युवक - वर्ग आणि महिला बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम दिवाळी सणा दरम्यानच्या अवकाळी पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता. १५ व १६ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पूर्वनियोजित पद्धतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख व न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, प्रशांत साटेलकर, आशिष झाटये, निखिल कुडव, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवस पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला स्पर्धा, खाद्य संस्कृती शॉर्टी, नृत्य स्पर्धा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर रात्रीच्या सत्रात डीजे नाईट कार्यक्रम संपन्न झाला.
दुसऱ्या दिवशी झालेल्या पारंपरिक व आधुनिक फुगड्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. दोन्ही दिवशी आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
निवृत्त शिक्षक तसेच सामाजिक व सांस्कृतिक जाणकार श्री. त्रिंबक आजगावकर (गुरुजी) यांच्यासह वामन राऊळ आणि आदित्य निर्गुण यांनी कार्यक्रमात सूत्रसंचालन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल