ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सातव्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सातव्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज.

प्रकाशन: 17 Nov 2025 02:15 PM
वाचन संख्या 138

मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सातव्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज.

Article image

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज :  मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या ( १६ नोव्हेंबर २०२५) दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेना यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.


सकाळच्या पहिल्या सत्रात शिवसेना आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुका प्रमुख राजा गावडे, राजा गावकर, बाळू तारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन तसेच घोषणाबाजी करत शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 


त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, अशोक सावंत, रविकिरण तोरसकर, राजू परुळेकर, रणजीत देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उमेदवारांच्या उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 


दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, यांच्यासह पोलीस तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून ममता मोहन वराडकर, भाजपमधून शिल्पा यतीन खोत, अन्वेषा अजित आचरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक एक अ मध्ये शिवसेनेकडून वसंत देवेंद्र गावकर, एक ब मध्ये शिवसेनेकडून देवयानी सुरेश शिर्सेकर भाजपमधून दर्शना नामदेव कासवकर, प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये शिवसेनेकडून महेश श्रीकृष्ण सारंग, भाजपमधून ललित हरी चव्हाण, दोन ब मध्ये शिवसेनेकडून पूजा मंगेश मांजरेकर, भाजपमधून अमृता अनिकेत फाटक, तारका हरी चव्हाण, प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये शिवसेनेकडून दीपक गणपत पाटकर, तीन ब मध्ये शिवसेनेकडून नीना गोविंद मुंबरकर, ठाकरे शिवसेनेकडून गिरीजा गौरव वेर्लेकर, भाजपमधून सुवर्णा सुहास वालावलकर, प्रभाग क्रमांक चार अ मध्ये शिवसेनेकडून सिद्धार्थ मनोहर जाधव, ठाकरे शिवसेनेकडून सुमित काशिनाथ जाधव, भाजपामधून रोहन रजनीकांत पेंडूरकर, चार ब मध्ये शिवसेनेकडून पूनम नागेश चव्हाण, भाजपामधून संतोषी संतोष कांदळकर, प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये शिवसेनेकडून विलास गणपत मुणगेकर, भाजपा मधून यतीन परशुराम खोत, पाच ब मध्ये शिवसेनेकडून नंदिता धोंडू वरवडेकर, भाजपामधून महानंदा किशोर खानोलकर, प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये शिवसेनेकडून सहदेव निळकंठ बापर्डेकर, सहा ब मध्ये शिंदे शिवसेने कडून अश्विनी अनिल कांदळकर, भाजपामधून महिमा महेश मयेकर, प्रभाग क्रमांक सात अ मध्ये शिंदे शिवसेनेकडून नरेश चंद्रकांत हुले, जाबीर चांद खान, भाजपमधून सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर, सात ब मध्ये शिवसेनेकडून मेघा उपेंद्र गावकर, भाजपामधून दिपाली दिलीप वायंगणकर, प्रभाग क्रमांक आठ अ मध्य शिवसेनेकडून राजेंद्र सदानंद परुळेकर, भाजपा मधून संतोष मधुकर शिरगावकर, आठ ब मध्ये शिवसेनेकडून शर्वरी शैलेंद्र पाटकर, ठाकरे शिवसेनेकडून आकांक्षा उमेश शिरपुटे, भाजपा मधून मरीना मोतेस फर्नांडिस, प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये शिवसेनेकडून महेश अशोक कोयंडे, भाजपामधून सन्मेष सुरेश परब, नऊ ब मध्ये शिवसेनेकडून प्रमिला प्रदीप मोरजे, भाजपामधून अन्वेषा अजित आचरेकर, प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये शिवसेने कडून शांताराम बाबाजी लुडबे, भाजपामधून रमेश बापू हडकर, दहा ब मध्ये शिवसेनेकडून भाग्यश्री सुरेश मयेकर, ठाकरे शिवसेनेकडून राधिका सुनील मोंडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात यांच्याकडे सादर केले. आज १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स