ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
अनिल कांदळकर यांच्या इशाऱ्याची बांधकाम विभागाने घेतली दखल.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अनिल कांदळकर यांच्या इशाऱ्याची बांधकाम विभागाने घेतली दखल.

प्रकाशन: 15 Nov 2025 06:10 AM
वाचन संख्या 106

अनिल कांदळकर यांच्या इशाऱ्याची बांधकाम विभागाने घेतली दखल.


त्वरीत काम पूर्ण करण्याची दिली हमी


ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील विरण बाजार पेठेतील बंदीस्त गटारांचे काम अपूर्ण असतानाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी दुर्लक्ष केल्याने येथील जनतेला व वाहतुकीला धोका निर्माण झाला होता कारण विरण बाजार पेठेतील मुख्य नाक्यावरील गटारे बंदीस्त बांधण्यात न आल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहने वळताना पुरेशी जागा नाही व उघडी गटारे असल्यामुळे वाहने चालकासह थेट गटारात जातात व अपघात होत आहेत या गंभीर समस्येची दखल घेऊन माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी नुकताच माध्यमांच्या द्वारे बांधकाम उपविभाग मालवण यांना इशारा दिला होता. विरण - पोईप बाजार पेशशतील ब्रीज वर पडलेले खड्डे आणि वाळूचे साम्राज्य यामुळे बाजार पेठेतील व्यापारी, रहिवासी व वाहन चालक हैराण झाले आहेत त्या बाबतही संबंधित खात्याला जाब विचारला असतानुकतीच बांधकाम उपविभाग मालवण चे कनिष्ठ अभियंता पुरुषोत्तम भोय व दिपक तोडवल यांनी विरण बाजार येथे कांदळकर यांनी भेट घेतली व बंदिस्त गटारांच्या अपुर्ण कामाची व विरण पोईप ब्रीज वरील खड्डे, धुळीचे साम्राज्य यांची पाहणी केली असून काही बंदिस्त गटारे उघडी आहेत त्यांच्यावर दोन दिवसांत झाकणी घातली जातील तर मुख्य नाक्यावर दुतर्फा बंदिस्त गटारे बांधकाम करण्यासाठी आपण त्वरित एसटीमेंट बनवून त्याला निधी मंजूर करून घेऊन डीसेंबर पर्यंत काम करुन घेतले जाईल तसेच ब्रीज वरील रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण येत्या आठ दिवसांत ठेकेदाराकडून करून घेण्यात येईल अशी हमी कांदळकर यांना दिली आहे.या मुळे येथील सर्व समस्या मार्गी लावण्यात कांदळकर यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याने येथील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. 


या वेळी संबंधित अधिकारी व पंकज वर्दम, बाळा नाईक, रविंद्र कुशे, प्रितेश पाटकर जितेंद्र परब हे उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.


पोईप | संजय माने

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स