ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष : आमदार निलेश राणे
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष : आमदार निलेश राणे

प्रकाशन: 14 Nov 2025 10:47 PM
वाचन संख्या 137

मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष : आमदार निलेश राणे.

Article image


मालवणात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश


आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत केले स्वागत.


मालवण | प्रतिनिधी : मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष ठेवून शिवसेना कार्यरत राहणार आहे. राणे साहेबांचे विशेष लक्ष नेहमीच मालवण शहरावर राहिले आहे. आगामी काळातही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी प्राप्त करून प्रत्येकाला हेवा वाटेल असे २१ व्या शतकातील आदर्श मालवण शहर बनवणार, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. 


मालवण शहर प्रभाग दहा व प्रभाग सात तसेच शहर परीसरातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 


आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श असे मालवण शहर बनवण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने मालवण नगरपरिषदवर भगवा फडकणारच. सर्वांनी एकसंघ काम करूया. जनतेची सेवा करण्यासाठी सेवक म्हणून काम करा. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठया प्रमाणात निधी येणार शहराचा गतिमान विकास होणार. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.


यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, मोहन वराडकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, जिल्हाप्रवक्ते राजा गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावडे, संपर्क प्रमुख राजेश गांवकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, शहर संघटक राजू बिडये, सहदेव बापार्डेकर, राजन परुळेकर, शेखर गाड, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, अल्पसंख्यांक शहर प्रमुख मार्टिना फर्नांडिस, निकीत वराडकर, हेमंत चव्हाण, भाऊ मोरजे, संदेश चव्हाण, वसंत गांवकर, संदीप मालंडकर, शिवाजी केळूसकर, मंदार लुडबे, जॉन फर्नांडिस, प्रसाद आडवणकर, नारायण धुरी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


वायरीत अनेकांचा पक्षप्रवेश.


दरम्यान, वायरी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात वायरी भुतनाथ ग्रामपंचायतचे सदस्य तेजस लुडबे, भाग्यश्री मयेकर, मकरंद मयेकर, जानव्ही मयेकर, प्राजक्ता मयेकर यांसह वायरी प्रभाग दहा मधील अनेक सहकारी उपस्थित होते. याबरोबर मालवण शहर प्रभाग सात मधील उबाठा कार्यकर्ते नरेश हुले, फारूक मुकादम, योगेश मेस्त्री, यतीन केळूसकर, राजेश वाघ, कल्पेश हुले, निकिता जोशी, निशा हुले, नमिता हुले, ओवी, विशाल आचरेकर, जाबीर खान यांसह अनेक सहकारी उपस्थित होते. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. 


फारूक मुकादम यांची अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स