मंत्री अमित शहा व मान्यवरांच्या उपस्थितीत शशिकांत तांबे यांचा होणार सन्मान.
मंत्री अमित शहा व मान्यवरांच्या उपस्थितीत शशिकांत तांबे यांचा होणार सन्मान.
पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि कवी शशिकांत तांबे यांची माहिती.
कणकवली | ब्यूरो न्यूज : मुंबई शिक्षक साहित्य मंडळ, मुंबई आयोजित, यंदाचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' व 'राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सन्मान' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ राष्ट्रीय व ३८ राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना जाहीर झाला आहे. शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी, मुंबई येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुप्रसिद्ध अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता जोशी (सराफ) प्रसिद्ध संगीतकार अन्नु मलिक व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. खुद्द शशिकांत तांबे यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे.
शशिकांत तांबे यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडणार असून विविध स्तरांतून शशिकांत तांबे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल