कुडाळ येथे मुलांसाठी १५ नोव्हेंबर रोजी मोफत तपासणी शिबीर.
कुडाळ येथे मुलांसाठी १५ नोव्हेंबर रोजी मोफत तपासणी शिबीर.
जन्मजात बालकापासून १८ वर्ष वयोगटातील मेंदूचे विकार, फिट्स, चक्कर, अपस्मार ( एपिलेप्सी) यांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांची तपासणी.
मसुरे | प्रतिनिधी : जन्मजात बालकापासून १८ वर्ष वयोगटातील मेंदूचे विकार, फिट्स, चक्कर, अपस्मार (epilepsy / एपिलेप्सी) यांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी तपासणी शिबीर शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात MRR CHILDREN HOSPITAL, THANE येथून न्यूरो सर्जन आणि टीम उपस्थित राहणार आहेत. या शिबीरामध्ये मुलांना चक्कर येणे, दातखिळी बसणे, डोकेदुखी, दृष्टी मध्ये बदल, वागणुकीतीतील बदल इत्यादी लक्षणे आढळणाऱ्या व अपस्मारग्रस्त बालकांची तपासणी करण्यात येणार असून शस्त्रक्रियेस पात्र लाभार्थ्यांना मुंबई येथे खाजगी रुग्णालयात संदर्भीत करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी (9422373188) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.