ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
प्रत्येक कार्यकर्ता उत्साहात : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

प्रत्येक कार्यकर्ता उत्साहात : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे.

प्रकाशन: 13 Nov 2025 04:32 PM
वाचन संख्या 104

प्रत्येक कार्यकर्ता उत्साहात : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे.


Article image


कणकवलीत श्री देव स्वयंभूच्या चरणी श्रीफळ ठेवून भाजप प्रचाराचा शुभारंभ. 


कणकवली | ब्यूरो न्यूज : श्री देव स्वयंभू चरणी वंदन करुन आणि श्रीफळ ठेवून भाजपाने गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी कणकवलीत भाजपच्या नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 'निवडणुकीत भाजप विजय होवो', असे गाऱ्हाणे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव स्वयंभूकडे घातले. दरम्यान, नगरपंचायतीच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या विचारांचा नगराध्यक्ष येईल, असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला.


यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कामतेकर, किशोर राणे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, अभय राणे, अभिजीत मुसळे, ॲड. विराज भोसले, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, संजना सदडेकर, महेश सावंत, राजू गावणकर, गौरव हर्णे, गौतम खुडकर, स्नेहा अंधारी, महेंद्र अंधारी, गंगाधर सावंत, कुंदन हर्णे, भरत उबाळे, किरण जाधव, नवू झेमणे, राजा पाटकर, गंगाराम सावंत, प्रद्युम मुंज, सुशील दळवी, मिथून ठाणेकर, राकेश राणे, चारुदत्त साटम, सखाराम राणे, स्वप्नील राणे, माधवी मुरकर, स्नेहा अंधारी, आकांक्षा राणे, आर्या राणे, ज्योती परब, मयुरी चव्हाण, अनुष्का जाधव, मनस्वी ठाणेकर, कल्याण पारकर, अमोल रासम, शिवसुंदर देसाई, सिद्धेश वालावलकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २००८ सालापासून कणकवली नगरपंचायतीवर भाजपाचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्षासह १७ नगरसेवक भाजपाचे निवडून येतील. नगरपंचायतची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा मीच नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचा उमेदवार मानून पक्षाचा प्रचार करीत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राणेंच्या विचारांचा नगराध्यक्ष होईल आणि त्यांच्या विचारांचे नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वयंभू मंदिरात प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव रवळनाथ, प. पू. भालचंद्र महाराज, पटकीदेवीचे दर्शन घेत भाजपाने शहरात प्रचाराला सुरूवात केली आहे, अशी माहिती मिळत आहे.


सौजन्य | कणकवली ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

लोकप्रिय टॅग्स