ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक..!

प्रकाशन: 10 Nov 2025 07:04 PM
वाचन संख्या 111

उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक..!


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर नगर पंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या (MCMC) माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३ नगर परिषदांसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि १ नगर पंचायतसाठी (कणकवली) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक ३२, गुरुवार, ऑक्टोबर ९ २०२५/ १७, शके १९४७ यानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. 


इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, ), संकेतस्थळे आदींचा समावेश होतो. समाजमाध्यमे (सोशल मीडिया, यात इंटरनेटद्वारे वापरली जाणारी संवादाची आणि माहितीची अशी व्यासपीठे की ज्याद्वारे लोक एकमेकांशी संवाद साधतात. माहिती शेअर करतात. प्रतिक्रिया व्यक्त करतात, मते किंवा विचार मांडतात आणि विविध प्रकारची माहिती (फोटो, व्हीडिओ, लेख, बातम्या), इतरांपर्यंत पोहोचवतात. उदा. एक्स (पूर्वीचे ट्विटर), व्हीडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मस (उदा. फेसबुक, लिंक्डइन इ.), मायक्रो ब्लॉगिंग साइटस, मेसेजिंग ॲप्स (उदा. व्हॉटसॲप, टेलिग्राम), तसेच कोलॅबोरेटिव्ह टूल्स (उदा. विकी डिस्कशन फोरम्स) इत्यादींचा समावेश होतो. 


जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत-

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे आहेत. याशिवाय या समितीत सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला व नगरपंचायत कणकवली, मुख्याधिकारी नगरपरिषद सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला व नगरपंचायत कणकवली हे असणार आहेत.  


या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, पहिला मजला, ओरोस, सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे सादर कराव्यात. प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स