ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत निवडणूक जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत निवडणूक जाहीर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत निवडणूक जाहीर. 




सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद, मालवण नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे.


निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी, सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत असून मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. मतमोजणीचा निकाल १० डिसेंबर रोजी राजपत्रमध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

Article image



निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम निर्गमित केलेल्या वेळेपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यत अंमलात राहील. वरील आचारसंहिता सार्वत्रिक निवडणुकांकरीता नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभन देणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही. अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या https://mahasecelec.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स