ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
श्री कालिका देवी मंदिर, हडी येथे त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव भक्तीपूर्ण उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

श्री कालिका देवी मंदिर, हडी येथे त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव भक्तीपूर्ण उत्साहात.

प्रकाशन: 05 Nov 2025 09:09 PM
वाचन संख्या 88

श्री कालिका देवी मंदिर, हडी येथे त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव भक्तीपूर्ण उत्साहात.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : श्री कालिका देवी मंदिर, हडी ( ता. मालवण) येथे ४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव भक्तीपूर्ण उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरात दिव्यांची आरास व रांगोळी कला अविष्कारा प्रभू श्रीराम प्रतिमा साकारली गेली.


त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवानिमित्त कालिका देवी मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास करण्यात आली. त्यानंतर महाआरती होऊन ओटी भरण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर गावराठीचे देव नागेश्वर मंदिर येथून कालिका मंदिर येथे आगमन झाले. सायंकाळी दीपोत्सव साजरा होऊन मंदिर परिसरात दिव्यांची आरास करण्यात आली. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. रात्री गडगेवाडी सेवा मंडळ, हडी यांचे भजन, पोथी वाचन व बारापाच मानकऱ्यांच्या हस्ते गणेश पूजन व रात्री १२ वाजता गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. यानिमित्त रात्री भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. या जत्रोत्सवास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 288

लोकप्रिय टॅग्स