युडीआयडी कार्ड नोंदणी व पडताळणीसाठी १८ नोव्हेंबर रोजी शिबिर.
युडीआयडी कार्ड नोंदणी व पडताळणीसाठी १८ नोव्हेंबर रोजी शिबिर.
लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यायचे तहसीलदार वर्षा झालटे यांचे आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ज्या लाभार्थीकडे युडीआयडी कार्ड नाही किंवा ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्या पडताळणीसाठी आणि कार्ड काढण्यास मदत करण्यासाठी १८ नोव्हेंबर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थींना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हे अनुदान १५०० रुपये इतके होते, ते आता शासन निर्णयानुसार वाढवून २५०० रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे.
या वाढीव अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आणि शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडील शासन परिपत्रकानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी युनिक डिसॅबिलिटी आयडेंटीटी कार्ड म्हणजेच वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युडीआयडी कार्डसाठी ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांनी शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर त्वरित फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म महा ई सेवा केंद्रात भरावा.
फॉर्म भरताना आधारकार्ड, रेशनकार्ड, फोटो, लाभार्थ्यांची स्वाक्षरी संकेतस्थळावर नोंदणी करून त्याची पावती शिबिराच्या ठिकाणी आणायची आहे. यासह सर्व लाभार्थ्यांनी त्यांची वैश्विक ओळखपत्रे व प्रमाणपत्रांसह वेळेत शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सर्व लाभार्थ्यांच्या ओळखपत्राची तपासणी व पडताळणी केली जाणार आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.