आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दैवज्ञ भवन, मालवण येथील सभागृहात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक, २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. यावेळी पक्षाची निवडणूक रणनीती निश्चित करून संघटन मजबूत करत महाविजयाचा निर्धार करण्यात आला अशी माहिती मिळत आहे.
या बैठकीत आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनांची बळकटी आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सखोल करण्यात आल्याचे समजते.
या बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गावकर, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, शहरप्रमुख दीपक पाटकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने काम करत आगामी निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून देण्याचा संकल्प केला अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...