मालवण तालुका भाजपचे शिष्टमंडळ धडकले मालवण आगारात...!
वाहक,चालक व प्रवाश्यांचा सुरक्षेसाठी आगार व्यवस्थापकांशी साधला परखड संवाद….
मालवण | विवेक परब : मालवण आगाराच्या चालक व वाहकांच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील अनुचित् प्रकारानंतरही त्या मार्गाने एस.टी.ची फेरी होऊन पुन्हा मालवण डेपोच्या वाहक व चालकांना त्रास होऊ नये म्हणून मालवण तालुक्यातील भाजप शिष्टमंडळाने मालवण एस.टी.आगारात जात संबंधीत अधिकार्यांशी परखड संवाद साधला.
सुदेश आचरेकर, गणेश कुशे, बाबा मोंडकर,बाबा परब, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, विजू केनवडेकर, दिपक सुर्वे, संतोष गांवकर, महेश मांजरेकर, दिपक पाटकर, रवि घागरे आणि इतर कार्यकर्त्यांनी तसेच आगारातील एस.टी.कर्मचार्यांनी एस.टी.अधिकार्यांना चालक व वाहकाची जबाबदारी घेता येत नसेल तर त्या मार्गावर जे चालक व वाहक जाऊ इच्छित नाहीत त्यांची ड्युटी तिथे लावलीच जाऊ नये असे सांगत धारेवर धरले .
जिल्ह्याबाहेर जाणार्या एस.टी.मधील वाहक, चालक व प्रवासी यांची जबाबदारी घेत सुरक्षा पुरविली जावी असेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
राधानगरीत मालवण आगाराच्या एस.टी.कर्मचार्यांना गांधीगिरी करुन हार घातला व पुढील वेळी हार नाही तर मार मिळेल अशा आशयाची धमकी मिळाल्याचे वृत्त भाजप प्रदेशाध्यक्ष निलेश राणेंना समजताच त्यांनी मालवण तालुक्यातील शिष्टमंडळाला आगारात जायच्या सूचना दिल्या होत्या.
यानंतर आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना एस.टी.साठी सुरक्षा पुरविण्याच्या मागणीचे पत्रही दिले आहे.या संपूर्ण प्रकाराबद्दल भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर व अशोक सावंत यांनी परखड भूमिका घेत शिष्टमंडळाच्या भूमिका स्पष्ट केल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)