ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण नगरपरिषद नगरसेवक आरक्षण जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगरपरिषद नगरसेवक आरक्षण जाहीर.

प्रकाशन: 08 Oct 2025 08:56 PM
वाचन संख्या 637

मालवण नगरपरिषद नगरसेवक आरक्षण जाहीर. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली..प्राप्त माहितीनुसार, प्रभाग चार मध्ये अनुसूचित जाती आरक्षण निश्चित करण्यात आले. याठिकाणी एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आली. तर दुसरी जागा महिला सर्वसाधारण (खुली) आरक्षित करण्यात आली आहे. मालवण नगराध्यक्ष आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) हे यापूर्वीच निश्चित झाले आहे.


मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या उपस्थितीत टोपीवाला हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणं काढण्यात आली. यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


प्रभागनिहाय आरक्षण : प्रभाग १ अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग २ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ३ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ४ अ : अनुसूचित जाती, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ५ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ६ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ७ अ : सर्वसाधारण (खुले), ब: सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ८ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ९ अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १० अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 


यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, भाजपा महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, भाजपा शहर सरचिटणीस महिमा मयेकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, नरेश हुले यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स