ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
रस्ता सुरक्षा व प्रवासी सुविधा वाढणार.

रस्ता सुरक्षा व प्रवासी सुविधा वाढणार.

रस्ता सुरक्षा व प्रवासी सुविधा वाढणार.


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ( NHAI) नवीन पावलाची माहिती.


नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI) नवीन पाऊल उचलत आहे अशी माहिती मिळत आहे..


लवकरच महामार्गांवर QR कोड असलेले साइनबोर्ड (National Highway QR Code) बसवले जाणार असून, यामुळे प्रवाशांना प्रकल्पाशी संबंधित माहिती, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि जवळच्या सुविधा त्वरित मिळू शकतील.



महामार्ग गस्त, टोल व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक आणि निवासी अभियंता यांचे संपर्क

व आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1033, जवळील रुग्णालये, पेट्रोल पंप, शौचालये, पोलिस स्टेशन, रेस्टॉरंटस्, टोल प्लाझाचे अंतर, ट्रक पार्किंग, पंक्चर दुरुस्ती, वाहन सेवा केंद्र व ई - चार्जिंग स्टेशन अशी माहिती मिळू शकेल.


तसे विविध साईनबोर्ड, टोल प्लाझाजवळ, विश्रांती क्षेत्रं, ट्रक ले - बाय, महामार्गाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या संकेतस्थळी बसवण्यात येतील.



मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे QR कोड साइनबोर्ड केवळ आपत्कालीन व स्थानिक माहिती सहज उपलब्ध करून देणार नाहीत, तर रस्ता सुरक्षा वाढवतील आणि राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्यांचा अनुभव अधिक चांगला करतील.



दरम्यान NHAI ने मालमत्ता मुद्रीकरणावर भर दिला असून, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३५,००० ते ४०,००० कोटी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे उत्पन्न २४,३९९ कोटी होते. पुढील वर्षीचे लक्ष्य ३०,००० कोटी असून, प्रत्यक्ष उत्पन्न त्यापेक्षा अधिक राहील, असा अंदाज आहे. २०२३ पासून NHAI मुद्रीकरणासाठी मालमत्तांची वार्षिक यादी जाहीर करत आहे अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स