ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय स्पर्धां उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय स्पर्धां उत्साहात.

पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय स्पर्धां उत्साहात.


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात, पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. २६ व २७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या या चर्चासत्राच्या निमित्ताने, कोकण जिओग्राफर असोसिएशन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने निबंध, पोस्टर, वक्तृत्व, लोकनृत्य अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

पाच राज्यांमधून निबंध आणि पोस्टर जमा झाले होते. या अंतर्गत १५ निबंध, १८पोस्टर व ८ वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. 

     

निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ ऋतुजा रामचंद्र कवटकर(संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), तृतीय क्रमांक- तनिष्का विनय दळवी (स.ह. केळकर कॉलेज देवगड), आणि मयुरी संजय पाटील (गारगोटी कॉलेज) यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- सपना सत्यवान नाईक (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) , रॉयल खैतान बुलेटो (फोंडाघाट कॉलेज) यांना विभागून देण्यात आला. प्रथम क्रमांक - मेगल डिसोजा (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) यांनी प्राप्त केला.

   

Article image

पोस्टर मेकिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक- कदम स्नेहल महेश (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) व श्रीराम गावडे ( स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- देसाई निकिता प्रकाश (गारगोटी कॉलेज) आणि प्रथम क्रमांक -रासम सपना संतोष (फोंडाघाट कॉलेज) यांना मिळाला. 

    

वक्तृत्व स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक एंजल गोसावी (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) तृतीय क्रमांक- मिसबा काझी (स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय क्रमांक- श्रावणी गावडे (एस पी के लॉ कॉलेज सावंतवाडी) व पल्लवी गावडे (गारगोटी कॉलेज) आणि प्रथम क्रमांक - नीता धुरी (फोंडाघाट कॉलेज) यांना मिळाला. 

Article image

      

लोकनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक साक्षी परब आणि सानिया कदम (स. का. पाटील कॉलेज)यांच्या लोकनृत्याला मिळाला. तर द्वितीय क्रमांक स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या कोळीनृत्याला मिळाला. प्रथम क्रमांक कोरकू या फोंडाघाट कॉलेजच्या आदिवासी नृत्य सादरीकरणातला मिळाला. या स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप चषक, डिक्शनरी, प्रमाणपत्र व पदक असे होते. 

  

बक्षीस वितरण समारंभासाठी डॉ. धवल पांड्या, अर्थशास्त्र विभाग (गुजरात), डॉ. अंशू वर्मा संगीत विभाग (राजस्थान), संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण , सचिव गणेश कुशे, सदस्य, शैलेश पावसकर, सदस्य, डॉ रामचंद्र काटकर, स्कूल कमिटी अध्यक्ष, विजय केनवडेकर, अंतर्गत हमी कक्ष समिती सदस्य, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, अंतर्गत हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक मॅडम उपस्थित होत्या.

 

स्पर्धेसाठी कोकण जिओग्राफरचे सचिव डॉ. राजाराम पाटील, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ. उज्वला सामंत, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, डॉ सुमेधा नाईक यांचे सहकार्य लाभले अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स