ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवण तालुका पत्रकार समिती आयोजित घरगुती श्री. गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण तालुका पत्रकार समिती आयोजित घरगुती श्री. गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर.

मालवण तालुका पत्रकार समिती आयोजित घरगुती श्री. गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने श्री गणेशोत्सव २०२५ कालावधीत तालुकास्तरीय घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी मर्यादित, या स्पर्धेचा निकाल स्पर्धा प्रमुख अमित खोत व समीर म्हाडगुत यांनी जाहीर केला. 


या स्पर्धेत नितीन गावडे ( प्रथम क्रमांक), भूषण मेतर (द्वितीय क्रमांक) प्रफुल्ल देसाई (तृतीय क्रमांक) यांच्या घरच्या श्री गणेश सजावटीला सुयश प्राप्त झाले. 


स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक भाऊ भोगले, द्वितीय क्रमांक मनोज चव्हाण आणि तृतीय क्रमांक अर्जुन बापार्डेकर यांनी प्राप्त केले. 

Article image


शासकीय विश्रामगृह मालवण येथे पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीत स्पर्धा प्रमुख अमित खोत आणि निवड समिती सदस्य समीर म्हाडगुत यांनी पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, उपाध्यक्ष परेश सावंत, खजिनदार संदीप बोडवे, सदस्य आप्पा मालंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा निकाल जाहीर केला.


स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.


मालवण पत्रकार समितीचा स्नेह मेळावा, लवकरच आयोजित करण्यात येणार असून यावेळी पारितोषिक वितरण व अन्य सन्मान सुपूर्द केले जाणार आहेत अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली आहे अशी माहिती मिळत आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स