ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
सिंधुदुर्ग महाविद्यालयातील पर्यटन सप्ताह विषयक राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील पर्यटन सप्ताह विषयक राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप.

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील पर्यटन सप्ताह विषयक राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप. 



मालवण : जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय गेली चार वर्षे पर्यटन सप्ताह साजरा करते आहे. यंदाच्या पर्यटन सप्ताहाच्या पाचव्या वर्षी महाविद्यालयामध्ये २६ व २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचा समारोप २७ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभुझांट्ये सभागृहामध्ये कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या समारोप सोहळ्यासाठी मुख्य अतिथी मुंबई येथील साठे कॉलेजच्या मायक्रो बायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. शिल्पा जाधव उपस्थित होत्या.  


Article image

टुरिझम 360 डिग्री हा विषय इतका अभिनव आहे, या विषयांतर्गत अनेक विषयांचा आढावा गेल्या दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये घेण्यात आला, या विषयांवरती देशभरातून विविध राज्यातून आलेल्या प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले. हे शोधनिबंध कोकण जिओग्राफर या जर्नल मध्ये २६ सप्टेंबर रोजी दोन भागांमध्ये प्रकाशित करण्यात आले. या परिसंवादासाठी अनेकांनी सहभागी होत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यामुळे हा पर्यटन विषयक बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिसंवाद अत्यंत यशस्वी झाला आहे, असे उद्गार डॉ. शिल्पा जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये काढले. यशस्वी राष्ट्रीय परिसंवादासाठी त्यांनी संस्थेचे, महाविद्यालयाचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. 

Article image


समारोपाच्या सत्रापूर्वी तीन सत्रे संपन्न झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात इप्सोन टेक्नॉलॉजीचे संचालक अभियंता अरविंद परुळेकर यांचे वारसा स्थळांचे संवर्धन या विषयावर व्याख्यान आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन झाले. दुसऱ्या पेपर प्रेझेंटेशन सत्राचे अध्यक्षपद कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीचे डॉ. सागर पवार यांनी भूषवले. तिसऱ्या सत्रामध्ये बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज वेंगुर्ल्याच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील यांनी इको टुरिझममध्ये शिक्षण क्षेत्राची भूमिका या विषयावर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. 

समारोपाच्या सत्राचे प्रास्ताविक डॉ. उज्वला सामंत यांनी केले. या समारोप कार्यक्रमादरम्यान स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि फोंडाघाट महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. 


यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचा पाठिंबा आणि सर्व सहकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे अशा प्रकारचा राष्ट्रीय परिसंवाद घेणे शक्य झाले याचे सर्व श्रेय संस्थेचे आणि माझ्या सर्व टीमचे आहे, असे उद्गार काढले. 

संस्थेचे संचालक डॉ. शशिकांत झांट्ये यांनी जागतिक पर्यटन आणि स्थानिक पर्यटन याबद्दल विचार मांडले. 

कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात देशभरातून आलेल्या सर्व प्रतिनिधींचे, विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे आभार मानले. परिसंवादाच्या उद्घाटक डॉ. अंशू वर्मा या राजस्थानहून परिसंवादासाठी मालवण मध्ये आल्या आणि दोन्ही दिवस परिसंवादासाठी त्या उपस्थित होत्या. तसेच काल सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी भावमधुर गीते आणि राजस्थानी लोकसंगीत सादर केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. तारकर्ली टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी हा राष्ट्रीय परिसंवाद उत्तम झाला आणि यातून सर्व सत्रे आमच्या व्यवसायासाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी या राष्ट्रीय परिसंवादाच्या समन्वयक आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या कोऑर्डीनेटर डॉ. सुमेधा नाईक यांनी मालवणी बोलीतून गाऱ्हाणे घालत आभार प्रदर्शन केले. या गाऱ्हाण्यामध्ये उपस्थित सर्वांनी होय महाराजाचा गजर करत उत्साहाने प्रतिसाद दिला. 



यावेळी व्यासपीठावर डॉ. शिल्पा जाधव, श्री. साईनाथ चव्हाण, डॉ. शशिकांत झांट्ये, निवृत्त प्राचार्य डॉ. मिसाळे, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे पब्लिक रिलेशन ऑफिसर राजू नायक, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे, संचालक डॉ. रामचंद्र काटकर, डॉ. सागर पवार, डॉ. धनश्री पाटील, सहदेव साळगावकर, राम चोपडेकर, रवींद्र खानविलकर, सुमित मालवणकर, मनोज हिंदळेकर आदी मान्यवर तसेच देशभरातून आलेले प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी प्रतिनिधी, स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा वरिष्ठ कनिष्ठ विभाग प्राध्यापक वर्ग, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय कॅडेट कोअरचे कॅडेट्स, प्रशासकीय कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. 


या दोन दिवसीय बहुविद्याशाखीय पर्यटन विषयक राष्ट्रीय परिसंवादासाठी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, तारकर्ली टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटी, कोकण जिओग्राफर्स असोसिएशन, पिल्लाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रसायनी, डॉक्टर घाळी कॉलेज, गडहिंग्लज यांनी संयुक्तपणे योगदान दिले. या परिसंवादाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक, सह सन्मवयक डॉ. देविदास हारगिले, समन्वयक डॉ. मल्लेश खोत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. डॉ उज्ज्वला सामंत यांनी सूत्रसंचालन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स